मुंबई : कलाक्षेत्रातुन अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेते अभिषेक चॅटर्जी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मनोरंजन सुष्टीला धक्काच बसला आहे. अनेकजण अभिषेक यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

रिपोर्टनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने अभिषेक यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुपरस्टार अभिषेक चॅटर्जी हे बुधवारी रात्री शूटिंगवरून परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. घरी आल्यानंतर त्यांना उलट्या झाल्या, मात्र त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यांनतर त्यांना घरीच सलाईन लावण्यात आलं. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

अभिषेक चॅटर्जी हे बंगाली टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सिनेमात आपल्या अभिनयाची जादू दाखवली त्यात त्यांनी ‘इच्छादी’, ‘पिता’, ‘अपूर सांगा’, ‘अंदरमहल’, ‘कुसुम डोला’, ‘फागुन बू’, ‘खारकुटो’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम आहेत.