Motorola : (Motorola) लॉन्च होण्यापूर्वीच मोटोरोलाच्या Motorola Edge 30 Neo (Motorola Edge 30)फोनचे स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. सप्टेंबरमध्ये मोटोरोलाच्या फोनची सिरीज लॉन्च होणार असून जाणून घ्या या फोनचे सर्व फीचर्स.

मोटोरोला सप्टेंबरमध्ये नवीन सीरिज लॉन्च करणार आहे. बातम्यांनुसार, लॉन्च होण्यापूर्वीच या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन (Specification) लीक झाले आहे.

या फोनची बॅटरी, प्रोसेसर आणि स्टोरेजची माहिती टिपस्टर योगेश ब्रार यांनी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ब्रारच्या माहितीनुसार, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर असू शकतो आणि या फोनमध्ये 120Hz रिफ्रेशसह फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल.

रिपोर्ट्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, हा स्मार्टफोन याच महिन्यात 8 सप्टेंबर रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बरेच बोलले गेले आहे परंतु फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन पाहता त्याची किंमत अंदाजे 25,000 ते 32,000 रुपये असू शकते.

Motorola Edge 30 Neo डिस्प्ले

बातम्यांनुसार, टिपस्टरने सांगितले आहे की फोनमध्ये 6.2-इंचाचा OLED डिस्प्ले असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट काम करू शकतो, जो Moto G82 5G ला पॉवर करण्यास देखील उपयुक्त ठरेल.

Motorola Edge 30 Neo कॅमेरा, OS आणि बॅटरी

असे सांगितले जात आहे की Motorola Ed 30 मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल, ज्याचा मुख्य लेन्स 64MP असेल. यासोबतच या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 32 MP चा असू शकतो. दुय्यम सेन्सरसाठी, त्यात एक अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा दिसू शकतो, जो 13MP चा असेल.

हा फोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमसह बॉक्समधून बाहेर येऊ शकतो.बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 4020mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, ज्यासोबत 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.

Motorola Edge 30 Neo स्टोरेज

फोन निर्माते साधारणपणे फक्त 128 GB पर्यंत स्टोरेज देतात. पण मोटोरोला स्मार्टफोनच्या या मालिकेत व्हेरिएंटची निवड देण्यात आली आहे, Motorola Edge 30 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट आणि 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटमध्ये येऊ शकते. मोटोरोलावर प्रेम करणाऱ्यांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.