मुंबई : एसएस राजमौली यांच्या RRR चित्रपटाने पहिल्या दिवसांपासून चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहेत. प्रेक्षकांच्या मनात फक्त 1 काच दिवसात चित्रपटाने घर केलं आहे. दरम्यान, चित्रपटावर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता जी अर्थात मुनमुन दत्तानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुनमुन दत्ताने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘RRR’ चा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “हा चित्रपट आहे ज्याने आम्हाला थिएटरमध्ये जाण्यास भाग पाडले. राजामौली सरांसारखी दृष्टी कोणाकडे आहे असे मला वाटत नाही. ही व्यक्ती एक जिवंत आख्यायिका आहे आणि त्याच्या चित्रपटाने मलाही जिवंत केले. चित्रपट पाहिल्यानंतर मला ‘बाहुबली’च्या वेळी जसा धक्का बसला होता. तसाच बसला आहे. राजामौली सरांची दृष्टी आणि रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या अभिनयाने चित्रपटाचा अनुभव छान झाला. दोन्ही उत्कृष्ट अभिनेत्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटात जिवंतपणा आणला.” असं मूनमूनने म्हंटल आहे.

दरम्यान, RRR चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. मात्र गोष्ट फक्त एवढीच नाही. यात अनेक ट्विस्ट आहेत, ड्रामा आहे, भरभरून अॅक्शन आहे, डान्स आहे, थोडीफार कॉमेडीही आहे. राजामौलींचा हा चित्रपट म्हणजे ‘फुल पॅकेज’ आहे.