DELHI CAPITALS
MNS activists attack IPL players' bus

नवी दिल्ली : IPL 2022, 26 मार्चपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे. त्यामुळे सर्व संघ आता हळूहळू मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान, एक मोठी घटना समोर आली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसवर हल्ला करण्यात आला. मात्र, यावेळी बस पार्किंगमध्ये उभी असल्याने बसमध्ये एकही खेळाडू नव्हता. हा हल्ला मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत, एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध कलम 143, 147, 149, 427 अन्वये एफआयआर नोंदवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असून. या हल्ल्यात बसचा आरसा तुटला आहे. आयपीएल संघाला सरावाच्या ठिकाणी नेण्यासाठी बस नेमण्यात आली होती. मध्यरात्रीच्या सुमारास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बसजवळ जाऊन आपल्या मागण्यांचे पोस्टर बसवर चिकटवले, घोषणाबाजी केली आणि बसची तोडफोड देखील केली.

प्रत्यक्षात ही बस बाहेरची असल्याचे सांगितली जात आहे. संजय नायक नावाच्या कार्यकर्त्याने नंतर या प्रकरणावर माहिती देत सांगितलं, आयपीएलमधील संघाच्या प्रवासासाठी दिल्लीतील एका कंपनीला कंत्राट दिलं गेलं आहे. स्थानिक वाहतूकदारांना काम मिळत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.