मुंबई : वेगळे झाल्यानंतरही हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्यात खूप छान बाँडिंग आहे. दिवसेंदिवस एक मित्र म्हणून त्यांचे नाते अधिक घट्ट होत असल्याचेही दिसत आहे. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांना ज्या प्रकारे सपोर्ट करत आहेत ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
दरम्यान, सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी, पती हृतिक रोशन आणि त्याची मैत्रीण सबा आझाद यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे चौघेजण सगळ्यांसमोर एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नुकतेच, सुझान खानने गोव्यात नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. या निमित्ताने पार्टीचे आयोजन केल्याची माहिती आहे. या पार्टीला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. या पार्टीत सुझान खानचा बॉयफ्रेंड अर्सलान, हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद देखील उपस्थित होते. पार्टीच्या एक दिवस आधी, जिथे हृतिक सबा आझादसोबत मुंबई विमानतळावर दिसला होता, तिथे सुझैन अर्सलानसोबत हातात हात घालून दिसली होती.
गोव्यात पार्टी केल्यानंतर सुझान खानने पार्टीच्या फोटोचा एक रील व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये चौघेही एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. मात्र, सुझानने शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फारसा आवडलेला नाही. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आता त्यांना ट्रोल करत आहेत. काही नेटकऱ्यांनी ‘मिक्स बिर्याणी’ असे म्हणत ट्रोल केले आहे.