Mercedes : (Mercedes) मर्सिडीज लवकरच आपली इलेक्ट्रिक कार (Electric Car) लॉन्च करणार असून, Mercedes EQS 580 4Matic (Mercedes EQS 580 4Matic) असे या कारचे नाव आहे. लुक्स पासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या या इलेक्ट्रिक कारची सर्व खासियत.

जर्मनीची लक्झरी वाहन निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझ या महिन्यात 30 सप्टेंबर रोजी भारतात नवीन इलेक्ट्रिक कार Mercedes EQS 580 4Matic (Mercedes EQS 580 4Matic) लाँच करणार आहे. ही कार पूर्णपणे भारतात असेंबल केली जाईल. आतापर्यंत मर्सिडीज इलेक्ट्रिक कार देशात इतर देशांतून आयात केल्या जात होत्या.

ही कार (Car) भारतात असेंबल केली जाईल, त्यामुळे तिची किंमत खूपच कमी असण्याची शक्यता आहे. ही सेडान कार मर्सिडीजने त्याच्या डेडिकेटेड इलेक्ट्रिक व्हेईकल आर्किटेक्चर (EVA) प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. या कारचा लूक तिच्या पेट्रोल मॉडेलसारखा बनवण्यात आला आहे. मात्र, यामध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील.

मर्सिडीज EQS 580 4Matic चे डिझाइन

कारचा पुढचा भाग क्लोज ब्लॅक-आउट ग्रिलसह डिझाइन केला गेला आहे, ज्यामुळे ती इलेक्ट्रिक कारसारखी वाटते. तसेच या कारला स्पोर्टी लूक देण्यासाठी यामध्ये शार्प एलईडी हेडलॅम्प युनिट वापरण्यात आले आहे. यात फ्रेमलेस दरवाजे, 19-इंच अलॉय व्हील आणि फ्लश डोअर हँडल देखील मिळतात.

रेंज

या कारची रचना दोन इलेक्ट्रिक मोटर्सने करण्यात आली आहे. हे दोन्ही एक्सलवर प्रत्येकी एका मोटरद्वारे समर्थित असेल, या दोन्ही मोटर्स 516 bhp ची एकत्रित शक्ती आणि 856 न्यूटन मीटरचा कमाल टॉर्क निर्माण करू शकतात.

या कारला 4Matic म्हणजेच ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम मिळेल. पॉवरसाठी, या कारमध्ये 107.8 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाईल. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका चार्जवर 770 किमीपर्यंत धावू शकते.

किंमत

कंपनी पुण्याजवळील चाकण येथील उत्पादन प्रकल्पात EQS 580 असेंबल करेल. त्यामुळे त्याची किंमत 1.80 कोटी रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मर्सिडीजकडून त्याच्या नेमक्या किमतीचा खुलासा लाँचच्या वेळीच केला जाणार असला तरी, भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर ही कार पोर्शे टायकन जीटी आणि ऑडी ई-ट्रॉनशी स्पर्धा करेल.