मुंबई : बॉलिवूड अभनेत्री मलायका अरोरा बाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. खोपोली एक्स्प्रेस वेवर अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. याठिकाणी तीन गाड्यांची टक्कर झाली, त्यातील एक कार मलायका अरोराची होती. अपघातावेळी अभिनेत्री कारमध्ये उपस्थित होती. मिळालेल्या माहितीनुसार मलायका अरोराला किरकोळ दुखापत झाली आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, अभिनेत्रीला अपोलो रुग्णालयात नेण्यात आले होते, तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एफआयआर नोंदवणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मलायका अरोराच्या जवळच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोराला टाके पडले आहेत आणि आता ती बरी आहे. मात्र, या अपघातामुळे मलायका अरोराला चांगलाच धक्का बसला आहे. तिच्या डोक्याला फारसा मार लागलेला नाही, कारण अभिनेत्रीने डोक्याजवळ उशी ठेवली होती.
अपघात झाला तेव्हा मलायका अरोरा तिच्या रेंज रोव्हर गाडीत होती. तिची कार दोन वाहनांमध्ये अडकल्याने हा अपघात झाला. ती एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास करत होती. मलायका अरोराच्या अपघाताची बातमी ऐकून चाहते धक्क्यात आहेत.
अपोलो हॉस्पिटलनुसार, अभिनेत्रीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मलायकाचे सीटी स्कॅनही करण्यात आले होते, ज्यामध्ये तिचा रिपोर्ट एकदम ठीक आला आहे. मात्र, मलायकाला रात्रभर रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून रविवारी सकाळी तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.