मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच वेगवेगळ्या कारणांवरून सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मलायका रेड कार्पेटवर कॅमेरामनला पोज देताना दिसतीये. व्हिडीओमध्ये मलायकाच्या ग्लॅमरस लुकसह तिच्यातला खट्याळपणाही दिसून येतोय.
या व्हिडिओमध्ये मलायकाने काळ्या रंगाचा फिश शेपचा गाऊन घातला होता. तसेच, तिने स्मोकी आयमेकअप करून टाइट पोनी घातली होती आणि गळ्यात एक सुंदर नेकलेस परिधान केला होता. या लुकमध्ये मलायका खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. तेव्हा अचानक एक लहान मुलगा मलायकासमोर येऊन उभा राहिला. या मुलाने तिच्या ड्रेसला मॅचिंग असलेला ब्लॅक कलरचा कोट आणि पँट घातली होती. त्याला पाहताच मलायकाने त्याच्याशी हस्तांदोलन केलं.
यानंतर मलायकाने त्याला ‘तू आज रात्री माझ्यासोबत डेटला येशील का?’ असा प्रश्न विचारला. हे ऐकून तो मुलगा हसू लागला. पुढे मलायका त्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवते आणि आजूबाजूच्या उपस्थितांना विचारते, की हा कोणाचा मुलगा आहे? तो हरवला आहे का?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायका मुंबईतल्या एका सलूनमधून बाहेर पडून कारमध्ये बसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हाच्या मलायकाच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तेव्हा मलायका अरोरा डीप नेक रॅप-अप ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती. काहींना तिचा ड्रेसिंग सेन्स आवडला नाही आणि त्यांनी तिला ट्रोलही केलं होतं.