भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल’cनं याआधीच आयपीएल वगळता इतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यातच एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

धोनीनं CSK अर्थात चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं आहे. धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडे सोपवलं आहे.

त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. यामुळे धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

रविंद्र जडेजा सीएसकेचं नेतृत्त्व करणारा तिसरा खेळाडू ठरणार आहे. धोनीनं कर्णधारपदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय घेतला असला तरी चेन्नईच्या संघाचं यापुढेही प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळणार

असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देण्यात आली आहे.