दिवाळीला मौसम होणार मस्ताना ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात धो-धो पाऊस बरसणार, अलर्ट जारी, हवामान खात्याचा नवीन अंदाज पहा
Maharashtra Weather Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, दिवाळीचा सण मात्र तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. बाजारपेठा दिवाळीच्या सणामुळे सजल्या आहेत.
अशातच महाराष्ट्रातील मोसम पुन्हा एकदा मस्ताना होणार आहे. राज्यात आता ऐन हिवाळ्यात पाऊस हजेरी लावणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 6 नोव्हेंबरला सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर; उद्या अर्थातच 7 नोव्हेंबरला राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा आणि 8 नोव्हेंबरला राज्यातील सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
तसेच ८ ते ९ नोव्हेंबर दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीच्या काळातही हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी नऊ नोव्हेंबर पासून दिवाळीचा सण सुरू होणार आहे.
नऊ नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान दिवाळीचा सण राहणार आहे. दरम्यान या कालावधीत यावर्षी पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने काल अर्थातच रविवारी वर्तवला आहे.
IMD मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी राज्यातील हवामानाबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यांसाठी आठ तारखेपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच 8 ते 9 नोव्हेंबर दरम्यान कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीच्या आठवड्यातही पाऊस पडू शकतो असे कांबळे यांनी यावेळी सांगितले आहे.
तथापि, याबाबत आत्तापासूनच अंदाज बांधणे कठीण आहे पण आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. एकंदरीत कमी दाबाची स्थिती तयार होत असल्याने दिवाळीच्या काळात पाऊस पडण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होईल असा प्राथमिक अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.
तथापि, या कमी दाब क्षेत्रामुळे पाऊस पडेलच हे नक्की नाही. हवामान विभाग यावर सध्या लक्ष ठेवून आहे. पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली तर हवामान विभागाकडून माहिती दिली जाणार आहे.