Maharashtra Weather : (Maharashtra Weather) मुंबईमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे मुंबईमध्ये (Mumbai)आज मध्यम किंवा जास्त पाऊस (Rain) होऊ शकतो. काल दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा बरसल्या आहेत. हवामान विभागाने अद्याप काही स्पष्ट केले नसले तरी ऑक्टोबरमध्ये मान्सून पुन्हा परतण्याचा अंदाज बांधला जात आहे.

मुंबईत आज मुसळधार पाऊस (Mumbai)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज, 27 सप्टेंबर, मंगळवार मुंबईत आकाश ढगाळ राहील आणि त्यादरम्यान शहरात दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी 28 आणि 29 सप्टेंबर रोजी दुपारी किंवा संध्याकाळी महानगरात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

यानंतर, 30 सप्टेंबर रोजी शहरात ढगाळ वातावरण(Weather) राहील आणि हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मुंबईत (Mumbai)1 आणि 2 ऑक्टोबर रोजी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तपमानाचा विचार केला तर, आज किमान तापमान 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरमध्ये मान्सून मुंबईत परतणार

भारतीय हवामान खात्याने (IMD) सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला नाही. तथापि, IMD ने सांगितले की या काळात हलक्या पावसाच्या सरी पडतील.

दुसरीकडे, मुंबईत 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून पुन्हा एकदा परतण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरच्या सुमारास मुंबईत मान्सून परतला होता.