कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड ! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार 30 हजार रुपयांचे बोनस, पहा….
Maharashtra State Employee : दिवाळीचा सण आता बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 11 दिवसात दिवाळीचा सण सुरू होणार आहे. १२ नोव्हेंबर पासून यंदा दिवाळीचा सण साजरा होईल. यावर्षी 12 नोव्हेंबरला दीपावली, नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन साजरा होणार आहे.
यानंतर 14 नोव्हेंबरला दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा, रोजमेळ पूजन साजरा होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरला भाऊबीज सण साजरा होईल. बारा ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत यावर्षी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान दिवाळीपूर्वीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. महापालिका आयुक्त राजेश नर्वेकर यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सामग्रह अनुदान म्हणून 30 हजार रुपये दिले जाणार आहेत.
तसेच महापालिकेत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कार्यरत आहेत म्हणजेच करारावर भरती झालेले कर्मचारी आहेत त्यांना देखील 24 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. तसेच महापालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या आशा सेविकांना 14 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
याशिवाय पालिकेत ठोक मानधन, किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीच्या वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे, रोजंदारीतील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे 24 हजार इतके सानुग्रह अनुदान मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
नवी मुंबई महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे पालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. विशेष म्हणजे सानुग्रह अनुदान अंतर्गत दिली जाणारी ही रक्कम दिवाळी सणाच्या पूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश आयुक्तांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहेत.
निश्चितच, महापालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक फायद्याचा आहे. सणासुदीच्या काळात घेण्यात आलेला हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असून कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्य कर्मचाऱ्यांनाही लवकरच मिळणार हा लाभ
अशातच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भात एक अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 42 टक्के एवढा असून यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.
महागाई भत्ता 46% एवढा केला जाणार असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार झाला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मंजुरी मिळणार आहे.
ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांना यावेळी वितरीत होणार आहे. निश्चितच सणासुदीच्या काळात हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे.