Maharashtra Rain : (Maharashtra Rain) राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस हा पाउस सुरु राहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईत यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून हवामान विभागाद्वारे मुंबईमध्ये (Mumbai) यलो अलर्ट जारी केला आहे. तर 11 आणि 12 तारखेला विजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार पुढील काही दिवस मुंबईमध्ये पाऊस (Rain) राहण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान 10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सांगण्यात आलं आहे.

राज्यात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.