Maharashtra Politics : (Maharashtra Politics) महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. आज ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या याचिकेवर सुनावणी होणार असून, संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी आज होणार आहे.

आज महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून (Uddhav Thackray) जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत आज सुनावणी होणार आहे.

याचबरोबर महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या (MLA) निलंबनाचा मुद्दा, राज्यपाल आणि विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, शिवसेना नक्की कुणाची या आज निर्णय घेतले जातील.

अचानक झालेला सत्ताबदल आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेले बंड यामुळे अचानक राज्यात सत्तासंघर्ष सुरु झाला. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी विविध करण्यात आल्या आहेत. याच याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान एकनाथ शिंदेसोबत हातमिळवणी करून स्थापन करण्यात आलाय सरकारसाठी आजचा निकाल महत्वचा ठरणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, या घटनापीठात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.

या याचिकांवर होणार सुनावणी

शिंदे गटाची याचिका – उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात शिंदे गटाने याचिका दाखल केली आहे.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह यासाठी याचिका

शिवसेनेची याचिका – विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे अशी मागणी आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका.

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी झालेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा याचिका.