Maharashtra Politics : महाराष्ट्राचे राजकारण(Maharashtra Politics) सध्या वेगळे वळण घेत आहे. नक्की शिवसेना (Shivsena) कोणाची यावरून सुरु असलेल्या वादावर अखेर निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केला आहे. शिवसेनेचे ओळख असलेल्या धनुष्यबाण या चिन्हावर (Symbol) आणि नावावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. यामुळे आता हे नाव कोणत्याही पक्षास वापरता येणार नाही.

निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह (Symbol) गोठवले आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच खेळी सुरु झाली आहे. दरम्यान, 1968 मधील पक्ष चिन्हाच्या ऑर्डरनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि शिंदे (Eknath Shinde) गट या दोन्ही गटांना मान्य करावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरु झाली असून, यातून पुढे काय करता येईल याबाबतीत दोन्ही गटांमध्ये हालचाली सुरु झाल्याचा प्राथमिक अंदाज लावता येईल.

निवडणूक आयोगाने घेतले हे महत्वाचे निर्णय

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरता येणार नाही.

फक्त शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. मात्र, शिवसेनेशी संबंधित इतर कोणतेही नाव घेता येईल.

सोमवारपर्यंत दोन्ही गटांना नवीन चिन्ह निवड करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला दिली आहे.

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यापैकी एकाने माघार घेतल्यास दुसऱ्या गटाला शिवसेना नाव देण्यात येईल. कोणत्याही गटाने माघार घेतली नाही तर “शिवसेना”साठी राखीव असलेले “धनुष्यबाण” हे चिन्ह दोन्ही गटांपैकी कोणत्याही गटाला वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

दोन्ही गटांना नव्या चिन्हाची निवड करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी तीन तीन पर्याय दिले जाणार आहेत, असं देखील निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेता चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी उपलब्ध वेळ पुरेसा नाही. पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकामुळे निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे तसेच पक्षाचं नाव वापरण्यावर निर्बंध घातले आहेत.