Maharashtra Jobs : केंद्रीय सरकार आरोग्य योजना मुंबई येथे एकूण 84 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Recruitment)

केंद्रीय सरकार आरोग्य योजना (CGHS) मुंबई येथे मल्टी-टास्किंग स्टाफ, फार्मासिस्ट (अॅलोपॅथी), नर्सिंग ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क या पदाच्या एकूण 84 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज पाठविण्याचा पत्ता -अतिरिक्त संचालक केंद्र सरकार आरोग्य नियोजन कार्यालय, ओएलडी सीजीओ बिल्डिंग (प्रतिष्ठा भवन), तळमजला, दक्षिण विंग, 101, एमके रोड, न्यू मरीन लाइन्स, मुंबई हा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – cghs.gov.in ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
उमेदवारांनी वेळोवेळी जारी केलेल्या अद्यतनांसाठी आणि शुद्धीपत्रासाठी वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली जाते.