Maharashtra Metro : (Maharashtra Metro) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी (Job) नेमणूक करणे आहे. यामुळे महाराष्ट्र मेट्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. एकूण 23 जागांसाठी ही भरती (Recruitment) होणार असून यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1ऑक्टोबर आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग

अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ“ पदांच्या एकुण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2022 आहे.

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल,

लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ या पदांसाठी भारी होणार असूनशैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. या कामाचे ठिकाण हे नागपूर, पुणे (Pune) आणि मुंबई (Mumbai ) हे आहे.

या पदासाठी अर्ज शुल्क हा रु. 400/- इतका आकारला जाणार असून SC / ST and Women साठी केवळ 100/- रुपयांमध्ये हा अर्ज करता येणार आहे.

या जागेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. तर या अर्जाची एक प्रत महाव्यवस्थापक (एचआर) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, दीक्षाभूमीजवळ, नागपूर 440010 या पत्त्यावर पाठवावी.

या नोकरीसाठी (Job) अर्ज हा 17 सप्टेंबर 2022 सुरु करता येणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2022 आहे. या मुदतीमध्येच अर्जदारांनी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी www.mahametro.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.