Maharashtra Jobs : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे 124 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, वरिष्ठ, लघुलेखक, तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठी नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा ही अधीक्षक, वैयक्तिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, ज्युनियर अभियंता, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, एसएएस सहाय्यक यांसाठी 30 वर्षे इतकी आहे. तर एसएएस सहाय्यक, कार्यालय परिचर / प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ सहाय्यक, लघुलेखक, तंत्रज्ञ यांसाठी 27 वर्षे इतकी आहे. तर वरिष्ठ लघुलेखक, वरिष्ठ तंत्रज्ञ यासाठी 33 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा सामान्य/ OBC – NCL उमेदवार यांच्यासाठी रु. 400/- इतका आकारला जाणार आहे. तर SC/ ST/ PWD/ EWS उमेदवार यांसाठी शून्य असणार आहे. यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची आहे.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, VNIT नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर-440010 महाराष्ट्र हा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – vnit.ac.in ला भेट द्यावी.

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
उमेदवारांनी अर्जाची प्रत वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावी.
अर्ज करण्याची शेवटची 27 डिसेंबर 2022 आहे.