Maharashtra Jobs : महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) अंतर्गत “उपमुख्य अभियंता” पदाच्या 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र येथे उपमुख्य अभियंता या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
उपमुख्य अभियंत – 48 वर्षे,
महाजेनको कर्मचार्यांसाठी – 57 वर्षे
यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs. 800/- इतका आकारला जाणार असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs. 600/- इतका आहे, तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे.
अर्ज पाठविण्याच पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019 हा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in ला भेट द्यावी.
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठविणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.