Maharashtra Jobs : महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, नागपूर येथे एकूण 91 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Recruitment)

महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा, (Mahanirmiti) नागपूर येथे शिकाऊ उमेदवार या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता – ITI in Relevant Trade ही आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण खापरखेडा, नागपूर हे आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन (नोंदणी) आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येणार असून, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – Inward Section, सौदामिनी बिल्डींग, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, खापरखेडा- 441102 हा आहे. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in ला भेट द्यावी.

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी दि.12.12.2022, रात्री 12 च्या आधी आपले नाव www.apprenticeshipindia.org या ITI पोर्टलवर (Online Registration) नोंदणी करुन खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन नागपूर(Establishment Code E04202700007) पर्यायाला ट्रेड नुसार निवड (Apply) करणे अनिवार्य आहे.
दि. 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी उत्तीर्ण झालेले शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करु नये.
उमेदवारांनी अर्जाची प्रत व आवश्यक असलेली कागदपत्रे वरील संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.