Maharashtra Jobs : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत एकूण 596 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एकूण 596 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची असून, अर्जदाराची वयोमर्यादा ही 27 वर्षे इतकी आहे. यासाठी अर्ज सुरु होण्याची मुदत 22 डिसेंबर 2022 सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 ही आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.aai.aero ला भेट द्यावी.

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
ऑनलाईन अर्ज https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावरून सादर करावे.
अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे.