Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद (Aurangabad) येथे नोकरीची उत्तम संधी मिळत असून अशासकीय सदस्य या पदांसाठी भरती होणार आहे. एकूण दहा पदांसाठी ही भरती होणार असून 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत यासाठी अर्ज करण्याची मुदत दिली गेली आहे.

राज्यामध्ये जिल्हाधिकारी (Collectorate) तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय औरंगाबाद अंतर्गत अशासकीय सदस्य पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 28 ऑक्टोबर 2022 आहे.

जिल्हाधिकारी (Collectorate) कार्यालय औरंगाबाद येथे अशासकीय सदस्य या पदासाठी भरती होत असून, पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांनी या पदासाठी अर्ज करावा, यासाठीचे कामाचे ठिकाण हे औरंगाबाद आहे.

तर उमेद्वाराने यासाठी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.यासाठी अर्ज करण्याची मुदत 29 सप्टेंबर 2022 सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 ऑक्टोबर 2022 आहे.

दरम्यान अधिक माहितीसाठी अर्जदाराने aurangabad.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि  मूळ जाहिरात पाहावी.

असा करा अर्ज

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन सादर करायचा आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन सादर करावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्जाचा नमुना व इरत माहिती aurangabad.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे.