Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) भारतीय खाद्य महामंडळ येथे नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. यामुळे आता अनेक बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. यासाठी योग्य उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा.

भारतीय खाद्य महामंडळ (FCI) अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5983 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

भारतीय खाद्य महामंडळ (FCI) अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III या पदांसाठी भरती होणार असून, एकूण 5983 जागांसाठी ही भरती ओहणार आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा असून, या अर्जासाठी एकूण रु. 500/- इतका शुल्क आकारला जाणार आहे. अर्ज करण्याची मुदत सुरु झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in ला भेट द्यावी.

या पद्धतीने करा अर्ज

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
FCI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://fci.gov.in
नोंदणी प्रक्रियेसाठी तुमची संबंधित क्रेडेन्शियल्स एंटर करा.
यशस्वी नोंदणीनंतर, उमेदवारांना तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि प्रणालीद्वारे व्युत्पन्न केलेला पासवर्ड दिला जाईल. उमेदवारांना पुढील वापरासाठी हे तपशील जतन करण्याचा सल्ला दिला जातो.
नोटिफिकेशनमधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि सबमिट करा.
आता शैक्षणिक तपशील आणि इतर संबंधित तपशील प्रविष्ट करा.
शेवटी सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
पडताळणी केल्यानंतर अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा आणि पेमेंटसह पुढे जाण्यासाठी पेमेंट टॅबवर क्लिक करा.
यशस्वीरित्या अर्ज फी भरल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडी/फोन नंबरवर मेल किंवा संदेश प्राप्त होईल.
अर्ज जतन करा किंवा भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.