Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs)भारतीय हवामान विभागाद्वारे रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 165 रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून, या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2022 आहे.

भारतीय हवामान विभागद्वारे (Indian Meteorological Department) प्रोजेक्ट सायंटिस्ट “III”, प्रोजेक्ट सायंटिस्ट “II”, प्रोजेक्ट सायंटिस्ट “I”, रिसर्च असोसिएट, सिनियर रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या एकूण 165 रिक्त जागा (recruitment) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, दरम्यान यासाठी अर्ज करण्याची मुदत 9 ऑक्टोबर 2022 आहे तर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

भारतीय हवामान खात्याने प्रोजेक्ट सायंटिस्ट “III”, प्रोजेक्ट सायंटिस्ट “II”, प्रोजेक्ट सायंटिस्ट “I”, रिसर्च असोसिएट, सिनियर रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो या पदांसाठी भरती जाहीर केली आहे तर या नोकरीसाठी तब्बल 165 रिक्त जागा आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे .

दरम्यान या नोकरीचे (Job) ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही असू शकते तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
प्रोजेक्ट सायंटिस्ट “III” – 45 वर्षे
प्रोजेक्ट सायंटिस्ट “II” – 40 वर्षे
प्रोजेक्ट सायंटिस्ट “I” – 35 वर्षे
रिसर्च असोसिएट – 35 वर्षे
सिनियर रिसर्च फेलो – 28 वर्षे
ज्युनियर रिसर्च फेलो – 28 वर्षे

दरम्यान यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2022 असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – mausam.imd.gov.in ला भेट द्यावी.

असा करा अर्ज

या पदासाठी (Indian Meteorological Department) उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mausam.imd.gov.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2022 आहे.