Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप 19 कुसडगाव, अहमदनगर पोलीस विभाग अंतर्गत एकूण 278 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment) 

हे पण वाचा :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची उत्तम संधी.. 

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप 19 कुसडगाव, अहमदनगर पोलीस विभाग अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई या पदाची भरती होणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता – 12th Pass आहे.

यासाठीचे नोकरीचे ठिकाण – SRPF कुसडगाव, अहमदनगर हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे इतकी आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षे इतकी आहे.

दरम्यान, यासाठीचा अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी रु. 450 /- इतका आहे. तर मागास प्रवर्गासाठी रु. 350 /- इतका आकारला जाणार आहे. यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाइन स्वरूपाची आहे.

हे पण वाचा :- पर्यटन संचालनालयात नोकरीची उत्तम संधी, असा करा अर्ज..

यासाठी अर्ज करण्याची मुदत सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

हे पण वाचा :- पिंपरी चिंचवड पोलीस विभागात नोकरीची उत्तम संधी..