Maharashtra Jobs : सोलापूर जनता सहकारी बँक (JSB)येथे अनेक रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

सोलापूर जनता सहकारी बँक येथे महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. एकूण 19 जागा भरण्यात येणार असून, शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
महाव्यवस्थापक – 65 वर्षे
उपमहाव्यवस्थापक – 60 वर्षे
सहायक महाव्यवस्थापक – 50 वर्षे
वरिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक – 45 वर्षे
कनिष्ठ अधिकारी/शाखा व्यवस्थापक – 40 वर्षे

यासाठी ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर ऑफलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मुख्य कार्यालय, सोलापूर येथे अर्ज करावा. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार्यांनी पुढीलई-मेल वरती admin@sjsbbank.com अर्ज करावा.

दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2022 असून अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.sjsbbank.com ला भेट द्यावी.

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.sjsbbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
सदर पदांकरिता अर्ज ई-मेलद्वारे किंवा वरील दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात य्येणार नाही.