Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड,येथे एकूण 83 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा) या पदांच्या एकूण 83 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण इतकी आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण अकोला (Akola) हे आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in ला भेट द्यावी.

अर्ज फक्त ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे.
उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.
विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.