Maharashtra Jobs : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत एकूण 226 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिक (Nashik) अंतर्गत विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका महिला, समुपदेशक, STS, लसीकरण फील्ड मॉनिटर, EMS समन्वयक, लॅब तंत्रज्ञ, रक्त बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, रक्त बँक/ओटी तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, सुविधा व्यवस्थापक टेलिमेडिसिन, दंत सहाय्यक पदांच्या एकूण 226 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण नाशिक हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
18 वर्षे पूर्ण
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

दरम्यान, यासाठी अर्ज शुल्क हा खुल्या प्रवर्गासाठी रु.150/- इतका आहे तर राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- इतका आकारला जाणार आहे. तर यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, जि. नाशिक हा आहे.

दरम्यान, अर्ज करण्याची मुदत 03 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट- zpnashik.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
अर्ज सक्षम अथवा रजिस्टर डाकद्वारे/ कुरिअरने पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे.