Maharashtra Jobs : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत OIC पॉलीक्लिनिक, वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, नर्स सहाय्यक, दंत चिकित्सा/सहाय्यक, DEO, लिपिक, चालक, महिला परिचर, सफाईवाला, चौकीदार या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड हे आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे.

तर अर्ज पाठवण्याचा पत्ता – OIC. Stn HQS (ECHS Cell) अहमदनगर हा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 ही आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख ही 09 जानेवारी 2023 ही आहे. तर मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड हा आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – echs.gov.inला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2023 आहे.