Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (Mahapareshan), सोलापूर अंतर्गत एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज 07 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) यांच्या एकूण 63 जागांसाठी भरती होणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे इतकी आहे. (Recruitment)

दरम्यान, यासाठीचे नोकरी ठिकाण सोलापूर हे आहे तर अर्ज पद्धती ऑनलाईन स्वरूपाची आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022 तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in ला भेट द्यावी.

आवश्यक कागदपत्र

एस.एस.सी. गुणपत्रक/प्रमाणपत्र.
आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका (चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत).
शाळा सोडल्याचा दाखला.
आधार कार्ड (आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमुद केलेले नांव व आधारकार्डवर नमुद केलेल्या नावाशी सुसंगत असावे तसेच आधारकार्ड आपल्या प्रोफाईल (Profile)शी लिंक असणे आवश्यक आहे.)
मागास वर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी (Domicile) प्रमाणपत्र.
प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र-नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (अजा व अज प्रवर्गातील उमेदवार वगळून).
आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.