Maharashtra Jobs : अमरावती ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत एकूण 197 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 156 जागा आहेत, तसेच चालक (ड्रायव्हर) पदाच्या 41 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30th November 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- भारत राखीव बटालियन 03 कोल्हापूर अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांची भरती! 

अमरावती ग्रामीण पोलीस विभाग (Police) अंतर्गत पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई या पदांच्या एकूण 197 जागा भरल्या जणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता – 12th Pass आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण अमरावती ग्रामीण हे आहे.

यासाठीची वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे इतकी आहे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षे इतकी आहे. यासाठीच अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. 450 /- इतका आहे तर मागास प्रवर्गासाठी रु. 350 /- इतका आकारला जाणार आहे.

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाइन स्वरूपाची आहे तर अर्ज सुरु होण्याची तारीख – 9th November 2022 आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30th November 2022 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – amravatiruralpolice.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30th November 2022 आहे.

हे पण वाचा :- समर्थ सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु..