Maharashtra Jobs : महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग (Department Of Minority Development) अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. यासाठीची वयोमर्यादा 62 वर्षे इतकी आहे तर यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

ई-मेलचा पत्ता – desk4.mdd-mh@gov.in हा असून, अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा – अवर सचिव (का. 4) अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. 708, 7 वा माळा मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – 400032 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022 तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – mdd.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
तसेच अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.