Maharashtra Jobs : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे अंतर्गत एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) धुळे येथे स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, स्पेशलिस्ट, पॅरामेडिक हिअरिंग इंस्ट्रक्टर, फिजिओथेरपिस्ट, मेडिकल ऑफिसर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण धुळे हे आहे. यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

यासाठी अर्ज शुल्क हा खुला प्रवर्गासाठी रु. 150/- इतका आकारला जाणार आहे. तर राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- आहे. यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे हा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट : dhule.gov.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.