Maharashtra Jobs : सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण 335 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची मुलाखतीची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक (प्रशासन), पर्यवेक्षक स्टोअर्स, पर्यवेक्षक सिफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (संप्रेषण), इलेक्ट्रीशियन, वेल्डर, बहु-कुशल कामगार (ब्लॅक स्मिथ), बहु कुशल कामगार (कुक) या पदांच्या भरती होणार असून, एकूण 335 पदांसाठी ही भरती होणार आहे.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीची आहे. तर यासाठीची वयोमर्यादा – ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक (प्रशासन), पर्यवेक्षक स्टोअर्स, पर्यवेक्षक सिफर, हिंदी टायपिस्ट, ऑपरेटर (संप्रेषण), इलेक्ट्रीशियन, वेल्डर – 18 ते 27 वर्षे बहु-कुशल कामगार (ब्लॅक स्मिथ), बहु कुशल कामगार (कुक) – 18 ते 25 वर्षे इतकी आहे.

यासाठीचा अर्ज शुल्क – Rs. 50/- इतका आहे तर यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – GREF केंद्र, दिघी कॅम्प, आळंदी रोड, पुणे – 41111015 हा आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022 आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in ला भेट द्यावी.

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
तसेच उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.