Maharashtra Jobs : CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, रीजनल सेंटर मुंबई (National Institute of Oceanography, Mumbai) येथे एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, (NIO) रीजनल सेंटर मुंबई येथे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, मुख्य प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी-II, प्रकल्प सहयोगी-I या पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविले जात असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

दरम्यान, यासाठीचे नोकरी ठिकाण मुंबई हे आहे तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, मुख्य प्रकल्प सहयोगी – 40 वर्षे
प्रकल्प सहयोगी-II, प्रकल्प सहयोगी-I – 35 वर्षे

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाइन (ई-मेल) स्वरूपाची आहे तर या ई-मेल पत्तावरती – hrdg@nio.org अर्ज करावा. दरम्यान, यासाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.nio.org ला भेट द्यावी.

इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.