Maharashtra Jobs : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे (Pune) येथे प्रोजेक्ट नर्सिंग सपोर्ट – II, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II, प्रकल्प संशोधन वैज्ञानिक – V, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III, प्रकल्प वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन प्रकल्प सहकारी, प्रकल्प संशोधन सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविन्यात येत असून, एकूण 12 जागांसाठी ही भरती होणार आहे.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
प्रोजेक्ट नर्सिंग सपोर्ट – II – 30 वर्षे
प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II – 30 वर्षे
प्रकल्प संशोधन वैज्ञानिक – V – 40 वर्षे
प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III – 30 वर्षे
प्रकल्प वरिष्ठ संशोधन सहकारी – 35 वर्षे
कनिष्ठ संशोधन प्रकल्प सहकारी – 28 वर्षे
प्रकल्प संशोधन सहाय्यक – 30 वर्षे
प्रकल्प प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 30 वर्षे

यासाठी अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची आहे तर अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, 20-A, डॉ. आंबेडकर रोड, PB क्रमांक 11, पुणे-411001 हा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022 यासाठीची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – niv.co.in ला भेट द्यावी.

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
कोणत्याही सरकारी विभाग/संस्थांच्या अंतर्गत नियमित टाइम स्केल सेवेत असलेल्या व्यक्ती अर्ज करण्यास पात्र नाहीत.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
उमेदवारांनी अर्जाची प्रत वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे, याची दक्षता घ्यावी.
अर्जाच्या हार्ड-कॉपीसह कोणतेही प्रमाणपत्र/कागदपत्रे पाठवण्याची गरज नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.
उशीरा आणि अपूर्ण ऑनलाइन अर्ज किंवा ऑनलाइनद्वारे सबमिट केलेले अर्ज किंवा इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेले अर्ज किंवा वेळेत सादर न केलेले ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी किंवा स्वाक्षरी आणि फोटोशिवाय ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.