Maharashtra Jobs : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई प्रोजेक्ट मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, रिअल इस्टेट एक्सपर्ट, क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट, प्रोक्युरमेंट एक्सपर्ट, फायनान्स एक्सपर्ट, प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदाच्या एकूण 08 जागासाठी भरती होणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
वयोमर्यादा –
प्रोजेक्ट मॅनेजर – 65 वर्षे
बिझनेस मॅनेजर – 65 वर्षे
रिअल इस्टेट एक्सपर्ट – 65 वर्षे
क्वार्टर्स मोनेटायझेशन एक्सपर्ट – 65 वर्षे
प्रोक्युरमेंट एक्सपर्ट – 65 वर्षे
फायनान्स एक्सपर्ट – 65 वर्षे
प्रोजेक्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह – 50 वर्षे
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह – 50 वर्षे

दरम्यान, यासाठी अर्ज पद्धती ही ऑफलाइन स्वरूपाची असून, अर्जदाराने सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 या पत्त्यावर अर्ज पाठवावा. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 नोव्हेंबर 2022 ही आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mumbaiport.gov.in ला भेट द्यावी.

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
वरील पदांकरीता अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या वेबसाईट वर प्रकाशित केलेली आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अहोद्र सादर करावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.