Maharashtra Jobs : राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर अंतर्गत हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, सर्जन, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, क्ष-किरण तंत्रज्ञ, डायरेक्टरी, डायथेरपीस्ट हायजेनिस्ट, दंत तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक एकूण
50 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविले जात आहेत.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण पालघर हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची असून अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा पालघर हा आहे. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022आहे तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.zppalghar.gov.in ला भेट द्यावी.

शैक्षणिक अर्हते बाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रीका
जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र
उमेदवाराच्या नावात बदल झाले असल्यास शासनाचे राजपत्र
पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
आधारकार्ड/पॅनकार्ड इतर आवश्यक कागदपत्रे.