Maharashtra Jobs : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. तसेच उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)

CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथे ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे.

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन नोंदणीद्वारे केली जाणार आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. यासाठी मुलाखतीचा पत्ता -कम्युनिटी सेंटर, CSIR-NCL, SBI समोर, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण रोड, पुणे-411008. हा आहे.

यासाठी मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.ncl-india.org ला भेट द्यावी.

निवडलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलली कागदपत्रे सोबत आणावी.
मुलाखतीची तारीख 14 डिसेंबर 2022 आहे.
मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.