Maharashtra Jobs : (Maharashtra Jobs) स्टेट बँकेत लिपिक (Clerk) पदासाठी भरती होणार असून, अनेक बेरोजगारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या नोकरीसाठीची जाहिरात प्रकाशित झाली असून यासाठीच अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची राहणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) लिपिक या पदासाठी भरती होणार असून , SBI ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार एकूण 5008 पदांसाठी ही भरती होणार आहे. जाहिराती नुसार SBI मध्ये लिपिक – ज्युनियर असोसिएट या पदासाठी भरती (Recruitment) होणार आहे तर,यातील 797 पदे ही महाराष्ट्रासाठी आहेत.

SBI (SBI) मध्ये क्लर्क कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) या पदासाठी भरती भरती होणार असून, यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

तसेच एकात्मिक दुहेरी पदवी (IDD) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी IDD उत्तीर्ण होण्याची तारीख 30.11.2022 किंवा त्यापूर्वीची असल्याची खात्री करावी लागणार आहे.

जे उमेदवार त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात/सेमिस्टरमध्ये आहेत त्यांची तात्पुरती निवड केल्यास, त्यांना 30.11.2022 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. ही आत मान्य करूनच त्यांनी अर्ज करावेत. या अटीच्या अधीन राहून तात्पुरते अर्ज करू शकतात.

यासाठी अर्ज शुल्क 750 इतका असणार असून SC/ST/OBC/PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी शून्य राहील. भरलेली फी पुन्हा परत केली जाणार नाही तसेच ही फी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.

यासाठी अर्ज करणाऱ्याचे वय 20 ते 28 वर्षे असावे तर यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा. यासाठी अर्ज करण्याची मुदत ही 07 सप्टेंबर 2022 सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 ही आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

या पद्धतीने करा अर्ज

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जाकरिता इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अर्जाच्या लिंकला भेट द्यावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
मग तुमची सर्व सामान्य माहिती आणि क्रेडेन्शियल(लॉगिन ID आणि पासवर्ड) भरा.
तुमच्या माहितीचे एकदा व्हेरिफिकेशन करा आणि शेवटी सबमिट करा.
आपण सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला SBI क्लर्क 2022 साठी अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज फी भरल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.
उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरकन्फर्मेशनचा मेल किंवा SMS प्राप्त होईल.
लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.