Maharashtra Jobs : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे “वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Recruitment)

अर्ज ऑनलाईनआणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2022 आहे. तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची 3 नोव्हेंबर 2022 तारीख आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Mahanagar Palika) येथे वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स या पदांसाठी भरती होत असून, ही भरती एकूण 79 जागांसाठी होणार आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आवश्यक आहे तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण कल्याण आहे.

यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे. MBBS, विशेषज्ञ – 70 वर्षे आणि इतर पदांकरिता – 65 वर्षे इतकी आहे. यासाठी अर्ज शुल्क हा खुला प्रवर्ग – रु. 150/- आणि राखीव प्रवर्गसाठी – रु. 100/- इतका आहे. यासाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2022 आहे. अर्ज पाठविण्याऱ्या उमेद्वाराने उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर- 2, ठाणे – 400064 या पत्त्यावर अर्ज पाठवावा. दरम्यान, ऑफलाईन अर्ज 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in ला भेट द्यावी.