Maharashtra Jobs : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Metro Rail Corporation Limited) येथे एकुण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची मुदत 05 डिसेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) येथे महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- II, संचालक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या पदांसाठी एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.दरम्यान, यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
महाव्यवस्थापक – 55 वर्षे
उप. महाव्यवस्थापक, सहाय्यक. महाव्यवस्थापक – 43 वर्षे
उप. नगररचनाकार, उप. अभियंता, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता- II – 35 वर्षे
संचालक – 45 ते 57 वर्षे

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठीचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (एचआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल-लाइन 3 ट्रान्झिट ऑफिस, E ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 हा आहे.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2023 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com ला भेट द्यावी.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज 05 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mmrcl.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
सरकारी क्षेत्रातील उमेदवारांनी त्यांचे अर्ज पोस्टल पत्त्यावर विहित नमुन्यात पाठवणे आवश्यक आहे.