Maharashtra Jobs : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- एक्झिम बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती अर्ज करण्यास मुदतवाढ, असा करा अर्ज.. 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत सहाय्यक उपाध्यक्ष (मार्कॉम), वरिष्ठ कार्यकारी (डिजिटल मार्केटिंग), वरिष्ठ कार्यकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) या पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तर यासाठीचा अर्ज शुल्क रु. 750/- इतका आहे. तर यासाठीची वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे –
सहाय्यक उपाध्यक्ष (मार्कॉम) – 35 वर्षे
वरिष्ठ कार्यकारी (डिजिटल मार्केटिंग), वरिष्ठ कार्यकारी (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – 30 वर्षे

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे तर अर्ज करण्याची मुदत सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – sbi.co.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) येथे नोकरीची सुवर्णसंधी..

उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे. वरील पदांसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख 28 ऑक्टोबर 2022 आहे. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.

उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2022 आहे.

हे पण वाचा :- वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत रिक्त पदांची भरती, असा करा अर्ज..