Maharashtra Jobs : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर (IIIT) येथे सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे.

यासाठीचा अर्ज शुल्क हा पुढील प्रमाणे आहे –

सामान्य/OBC/EWS उमेदवार – रु. 1180/-
SC/ST/PwD उमेदवार – रु. 590/-
भारताबाहेरील उमेदवार – रु. 1180/-

यासाठी अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येणार असून, अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर S. No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव- वारंगा, मु.पो.- डोंगरगाव (बुटीबोरी),
जिल्हा – नागपूर महाराष्ट्र पिन कोड – 441108 हा आहे.

तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 ही आहे. तर अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 ही आहे. दरम्यान, यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in ला भेट द्यावी.

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
तसेच अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.