Maharashtra Jobs : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ज्ञानवर्धनी अध्यापक महाविदयालय, हिंगोली येथे एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 05 डिसेंबर 2022 आहे. (Recruitment)

हे पण वाचा :- कोल्हापूर जिल्हा परिषदेत विविध रिक्त पदांची होणार भरती.. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (SRTMUN) अंतर्गत सहायक प्राध्यापक या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तर यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीची आहे.

दरम्यान, यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड-431606 हा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.srtmun.ac.in ला भेट द्यावी.

हे पण वाचा :- NTPC येथे नोकरी करण्याची उत्तम संधी, आजच करा अर्ज.. 

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
प्रमाणपत्राच्या सर्व साक्षांकित झेरॉक्स प्रती आणि इतर संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडली पाहिजेत.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
विहित अर्जाचा नमुना विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे: (www.srtmun.ac.in)
अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसात (05 डिसेंबर 2022) सादर करावे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

हे पण वाचा :- जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर अंतर्गत या रिक्त पदांची होणार भरती, असा करा अर्ज..