Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे (Pune) येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची शैक्षणिक पात्रता SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असणे ही आहे.

तर यासाठी नोकरीचे ठिकाण पुणे हे आहे. तर यासाठीची वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे आहे –
सवर्साधारण उमेदवार – 30 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 35 वर्षे

दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन (नोंदणी) स्वरूपाची आहे. तर यासाठीचा आस्थापना नोंदणी क्र. – E05202702197 हा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 ही असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in ला भेट द्यावी.

महावितरण भरती 2022 ऑनलाईन अर्ज करताना लागणारे महत्वाचे कागदपत्रे –

एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व सदर प्रमाण पत्राची साक्षांकित प्रत
आय. टी. आय उत्तीर्ण प्रमाणपत्र (चार सेमिस्टर गुणपत्रिका)
उमेदवारांने मागास प्रवर्गात अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत
उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना त्यांच्या आय. टी. आय. उत्तीर्ण प्रमाणपत्रावरील एकुन चार सेमिस्टरचे एकत्रित गुण नोंदवीने आवश्यक आहे. (फक्त कोणत्याही एकाच सेमिस्टरचे गुण नोंदवल्यास त्या अर्जाचा विचार केला जानार नाही.)