Maharashtra Jobs : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. (Recruitment)
टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) येथे ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.
दरम्यान, यासाठीची वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे. तर यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. यासाठी मुलाखतीचा पत्ता – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1 होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005. हा आहे.
दरम्यान, मुलाखतीची तारीख – 21 डिसेंबर 2022 ही आहे. तर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in ला भेट द्यावी.
पात्रता निकषांची पूर्तता करणारे उमेदवार खालील प्रकारे अर्ज करू शकतात.
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी https://apprenticeshipindia.org/loginअप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज TIFR http://www.tifr.res.in/positions वेबसाइटवर सबमिट करावयाचा आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.