Maharashtra Jobs : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, (NHM) जिल्हा आरोग्य सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे हृदयरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, sts RNTCP, RNTCP-STLS-TB, ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक, RSSK कौन्सेलर, RBSK , EMS समन्वयक, सिकल सेल, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, योग थेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी यूजी (युनानी), शितसाखळी तंत्रज्ञ , लसीकरण फील्ड मॉनिटर्स या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण हिंगोली हे आहे.
तर यासाठीचा अर्ज शुल्क पुढील प्रमाणे आहे –
खुल्या प्रवर्ग – Rs. 150/-
राखीव प्रवर्ग – Rs. 100/-

यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता NHM कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली हा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 असून, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – hingoli.nic.in ला भेट द्यावी.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह hingoli.nic.in वर उपलब्ध आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.