Maharashtra Jobs : महाराष्ट्र राज्य सरकारने एक उत्तम निर्णय घेतला असून, लवकरच सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकूण 10,127 जागांसाठी भरती (Recruitment) होणार आहे. अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
सरकारी नोकरीची प्रतीक्षा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक मोठी खुशखबर आली आहे. राज्य सरकार लवकरच येत्या काही महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात (Arogya Vibhag) तब्बल 10,127 जागांसाठी मेगाभरती होणार आहे अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुले सरकारी नोकरीची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांसाठी हे दिवाळीचं मोठं गिफ्ट असणार आहे.
संदर्भातील ऑफिशिअल नोटिफिकेशन लवकरच जरी करण्यात येणार असून, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे अशी माहिती महाजन यांनी दिली आहे.
या पदभरतीच्या एकूण 10,127 जागा आहेत. आणि याचे ऑफिशिअल नोटिफिकेशन 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023 या कालावधीत जारी होणार आहे. दरम्यान, या परीक्षांची तारीख – 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023 ही असणार असून याचा निकाल 27 मार्च ते 27 एप्रिल 2023 दरम्यान जाहीर केला जाईल.