Maharashtra Jobs : SSC CHSL अंतर्गत अनेक रिक्त पदांसाठी भरती होणार असून, यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2023 आहे. (Recruitment)

SSC CHSL (SSC CHSL) अंतर्गत लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी एकूण 4500 रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, यासाठीची शैक्षणिक पात्रता ही 12 वी पास ही आहे.

दरम्यान, यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्षे (किंवा जन्म 02 जानेवारी 1995 नंतर चा व 01 जानेवारी 2004 च्या अगोदरच असावा.) ही आहे. तर यासाठी SC/ST उमेद्वारांना 05 वर्षे सूट आहे. तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

यासाठी अर्ज शुल्क हा रु. 100/- इतका आकारला जाणार असून, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी 2022 ही आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in ला भेट द्यावी.

उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे.
इतर पद्धतीने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज हा दिलेल्या वेबसाईटवरून भरायचा आहे.
अर्ज हा शेवटच्या तारखेच्या अगोदर भरावा, कारण शेवटच्या तारखेला वेबसाईट डिस्कनेक्शन असल्यास अथवा इतर अडथळे आल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.
अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचे उमेदवारी नाकारली जाईल.
उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.